नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्ताव सादर करत आहेत. यावेळी मोदी काँग्रेस नेत्यावर भडकल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कायद्यांवर बोलत असताना विरोधकांनी गदाऱोळ करण्यास सुरुवात केली. यावेळी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मोदींच्या भाषणावेळी मध्येच बोलायला सुरुवात केली. यावरून मोदींनी अधिर रंजन यांना कडक शब्दात सुनावले.
मोदी बोलत असताना अधीर रंजन चौधरी वारंवार मध्ये अडथळा आणत होते. त्यामुळे मोदी पहिल्यांदा खाली बसले. त्यानंतर पुन्हा मोदी बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर मोदी संतापले. त्यांनी कडक भाषेत अधीर रंजन जी आता अती होत आहे. मी तुमचा आदर करतो. तुम्हाला बंगालमध्ये तृणमूलपेक्षा जास्त प्रसिद्धी नक्की मिळेल, काळजी करू नका. हे चांगले दिसत नाहीय. तुम्ही असे कधी वागत नाही, आता का वागताय, असा सवाल केला. तसेच राज्यसभेत काँग्रेसचे काय वेगळेच चाललेय आणि लोकसभेत काही वेगळेच अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडविली.
Adhir Ranjan ji, ab zyada ho raha hai. I respect you. You will get more publicity than TMC in Bengal. Don’t worry…This doesn’t look good, why are you doing this?: PM Narendra Modi in Lok Sabha as Leader of Congress in the House Adhir Ranjan Chowdhury interjects pic.twitter.com/kB7OEncEdF
— ANI (@ANI) February 10, 2021
यावेळी मोदी शेतकरी आंदोलनावर बोलले. कृषी कायदे कुणालाही बंधनकारक नाही, पर्याय आहेत… जिथे पर्याय आहेत, तिथे विरोधाचं काय कारण? जिथे फायदा होईल, तिकडे शेतकऱ्याने जावे असे कायद्यामध्ये आहे, असे मोदी म्हणाले.