Ankita PrabhuWalawalkar । Pushpa 2 : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट गुरुवारी, 5 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर नवा विक्रमही रचला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई करून सर्वांना चकित केले.
कमाईच्या बाबतीत, या चित्रपटाने पहिल्या दिवशी ‘KGF चॅप्टर 2’, ‘बाहुबली 2’ आणि SRK च्या ‘जवान’ सारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई आहे. ‘पुष्पा 2’ हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे.
या चित्रपटाची क्रेझ लोकांच्या मनात घर करून आहे. पहिल्या दिवसाच्या प्रभावी कमाईवरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो, ज्याने पहिल्याच दिवशी ‘KGF Chapter 2’, ‘Bahubali 2’ आणि SRK च्या ‘Jwan’ सारख्या मोठ्या चित्रपटांना पराभूत केले आणि सर्वात मोठा हिंदी ओपनर चित्रपट बनला आहे.
दरम्यान, अश्यातच ‘बिग बॉस मराठी 5’ फेम ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिनेसुद्धा या चित्रपटाविषयी एक पोस्ट लिहिली आहे. अंकिताने अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा हा चित्रपट पाहिला असून त्यावर तिचं मत व्यक्त केलं आहे. पण अंकिता ट्रोलिंगची शिकार झाली आहे.
झालं असं की, अंकिताने एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये ती म्हणाली… ‘अभिनय – 100 पैकी 100, पण कथानक- निराशाजनक, पुष्पाचा पहिला भाग दुसऱ्या भागापेक्षा खूप चांगला होता. कृपया तुमचे पैसे वाया घालवू नका. माझ्या मते मनोरंजन हे शक्तीशाली माध्यम असतं आणि जे चित्रपट मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचतात, त्यांच्याविषयी विशेष काळजी घेतली पाहिजे’, अशी पोस्ट अंकिताने लिहिली आहे.
अंकिताच्या या स्टोरीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘तू सांगणार आणि आम्ही ऐकणार का’, असं लिहित एका युजरने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर ‘तुला पण बिग बॉस मराठीमध्ये बघून आमचा वेळ वाया गेलाच आहे ना’, असं दुसऱ्याने म्हटलंय. अश्या अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत.