पपईचे औषधी गुणधर्म ऐकून चकित व्हाल

पपई – पपईचे नित्य सेवन हे अकारण होणारी उत्तेजना कमी करते. अस्वस्थपणा, घबराहट, हृदय धडधडणे इत्यादी विकारही दूर होतात. पपईमुळे मुखदुर्गंधीही जाते. म्हणूनच प्रत्येकाने रोज एक पपईची फोड तोंडात धरून तिचे चांगले चर्वण करावे आणि मग ती खावी. असे केल्याने आपले अन्नपदार्थ आठ तासांऐवजी सहा तासात पचतात. म्हणजेच ज्यांना शरीर कमवायाचे आहे त्यांनी नियमित पपई खावी. पपईचा आहारात समावेश म्हणजे सुदृढ प्रकृती मिळविणे. कारण पपई नुसती पाचकच नाही तर शक्तिदायी आहे.

विषनाशक : आपण जे खातो ते काही वेळा विजातीय असते. जे शरीरात विष उत्पन्न करते. असे शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी पपई उपयुक्‍त आहे. पपईचा मुरंबा नियमित रोज जेवणात घ्यावा. त्यामुळे पोटाच्या लहान व मोठ्या आतड्याच्या तक्रारी दूर होतात. पपईत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याची क्षमता आहे. पपई ही मूत्रलविकांरावर उपयुक्त आहे. जी गुदद्वाराची सफाई करते. थोडक्‍यात संपूर्ण शरीराला अमृतरस प्रदान करणारी पपई लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बल देते. शिवाय हे फळ स्वस्त असल्यामुळे सर्वजण खाऊ शकतात.

तेजस्वी कांतीसाठी : आपल्या तोंडाचे तसेच चेहऱ्याचे तेजस्वीपण पपईमुळे खुलते. ज्यावेळी शरीरात सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स जात नाहीत आणि त्वचा ओघळते तेव्हा पपईचा गर चेहऱ्याला लावावा. जो चेहरा तेजस्वी करतो. म्हणूनच चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी पपई रोज नियमित खावी. शरीरातील खनिज क्षार तसेच लवणाची कमतरता पपई दूर करते. जे लोक पपईच्या रसाने चेहरा धुतात किंवा गुळण्या करतात त्यांचे घशाचे विकारही दूर होतात. पपईच्या रसाने चेहरा धुतल्यामुळे चेहरा कांतिमान होतो. पपई शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवते. त्यामुळे लघवीद्वारे शरीरास नको ते पदार्थ बाहेर पडतात. लघवी तुंबणे तसेच थेंब थेंब लघवी होणे अशा विकारात पपई उपयुक्त आहे. म्हणूनच पपई आरोग्याच्या दृष्टीने एक चमत्कारच आहे

सर्व ऋतूत शरीराला उपयुक्‍त फळ : तसं पाहिलं तर उन्हाळ्यात पपई अधिक येते. पण आजकाल दक्षिणेकडची पपई सर्व ऋतूत येते. शरीराची एखादी शीर आखडली गेली तर पपई खावी. थोड्याशा कामाने जर खूप कंटाळा येत असेल, शरीर दमत असेल, कामात मन लागत नसेल, तरी देखील पपई खावी. ताजी पपई नेहमीच मिळेल असं नाही. म्हणून पपई घातलेले लाडू, मुरंबा, वड्या खाण्याची पद्धत दक्षिणेकडे आहे. कच्च्या पपईची भाजी शरीराला खूप उपयुक्त आहे. मौसमी विकार म्हणजे सर्दी, खोकला कायमचा जाण्यासाठी पपईचे लोणचे रोज खावे. मेंदूतील प्रक्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी पपई हे एक ब्रेन वॉश टॉनिकच म्हणावे लागेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.