मुंबई – केंद्रिय मंत्री नीर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षाचा बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा काल जाहीर करताच महाविकास विकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर सडकुन टीका केली आहे. भाजपच्या या जाहीरनाम्यात ‘बिहारमध्ये सत्ता मिळाल्यास सर्वांना करोनाची लस मोफत दिली जाईल’, अशी घोषणा करणाऱ्यात आली आहे.
दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपच्या आश्वासनाचा पंचनामा केला आहे. “निवडणूकीच्या प्रचारामध्ये मतं मागण्यासाठी भाजप पक्ष जनतेला ‘तुम मुझे वोट दो, हम तुम्हें वैक्सीन देंगे’ हा मंत्र देत आहे. मतांसाठी असा जाहीरनामा काढणे म्हणजे देशाचे भविष्य धोक्यात टाकणे होय . असं म्हणत राऊत यांनी भाजप पक्षावर सडकून टीका केली आहे.