पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत,पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना बोचरं पत्र

मुंबई – भाजप आमदार  गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी काही प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिली नाही तर जनता काय ते समजून जाईल, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.

त्यांनी  फेसबुक पोस्ट सेंड केली आहे की,’मा. बाळासाहेबांनी ज्यांच्याशी हयातभर संघर्ष केला, ज्यांची पाकधार्जिणा म्हणून खिल्ली उडवली,अशांसोबत मा.मु. आपणही पंतप्रधान #मोदीजींविरोधात सूर आवळताय व पत्र लिहताय. पण महाराष्ट्राच्या संदर्भात मी आपणाला पत्राद्वारे काही सवाल केले आहेत. याचे पण उत्तर देणार का? #किंबहूना देणार का?’ असा प्रश्न विचारत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

गोपीचंद पडळकर  यांची फेसबुक पोस्ट

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.