“तुम्ही हजार वर्ष सत्तेत राहा, पण…”; डोंबिवली अत्याचार प्रकरणावरून मुनगंटीवार सरकारवर भडकडले

मुंबई : डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर ३० जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला.  या घटनेतील २२ आरोपींना  मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेवरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर टीका  करताना, “या प्रकरणावर सरकारने दोन दिवस अधिवशेन बालावून चिंतन करावे”, असे म्हटले आहे. “साकीनाका नंतर आता डोंबवली प्रकरण राज्याचील अत्याच्याराच्या घटना आता सांगायला सुरवात केली तर २४ तास कमी पडतील. सरकारला आमची हात जोडून विनंती आहे. तुम्ही हजार वर्ष सत्तेत राहा, तुमची सत्ता सुरक्षीत ठेवा. पण राज्यातील महिलांवर बलात्कार होत आहेत आणि राज्यात आपण या गंंभीर विषयावर चर्चा करणार नाही. इतर राज्यातील घटनांच उदाहरण देऊन आपण राज्यातील घटनांकडे दुर्लक्ष करता, हे बरोबर नाही.”

डोंबिवलीच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष अधिवेशन राज्य सरकार घेईल, अशी अपेक्षा सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्ता केली. तेसच अशे प्रकार पुन्हा होणार नाहीत याकरीता कडक कायदे करण्याची आवश्यकता आहे. सरकार याबाबत चिंतन करू शकलं नाही तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात भयाचे वातावरण तयार झाले आहे. डोंबिवली भाग जो एक शांत भाग समजला जातो तेथे ही घटना झाली आहे. राज्य सरकारने विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.