बहुगुणी पीच फळ खायलाच हवे! होतील ‘इतके’ फायदे!

पुणे – आपण कधी पीच (Peach) खाल्ले आहे?  इंग्रजीमध्ये पीच नावाचे हे फळ खूप लोकप्रिय आणि स्वादिष्ट आहे.  असे मानले जाते की प्रथम याची लागवड चीनमध्ये केली जात होती, परंतु आता ती जगभर वाढविली जात आहे.  भारतात हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये याची लागवड केली जाते. 

या लालसर पिवळ्या रंगाच्या फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात आढळतात.  हे बहुगुणी फळ  घेतल्यास,  बर्‍याच समस्यांपासून आपण मुक्त होऊ शकता. चला तर, जाणून घेऊया पीच (Peach) फळाचे फायदे.    

* वजन कमी करण्यास उपयुक्त : 
पीच(Peach)मध्ये खूप कमी कॅलरी आढळतात. यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साखर असते, म्हणून याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत नाही. आपण वजन कमी करण्याचा विचार करत असल्यास, आपण नियमितपणे पीचचे सेवन करा.

* डोळ्यांसाठी देखील फायदेशीर : 
पीचमध्ये बीटा-कॅरोटीन नावाच्या एंटीऑक्सिडेंटची महत्त्वपूर्ण मात्रा असते, जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मोतीबिंदू रोखण्यासाठी देखील हे उपयुक्त मानले जाते. म्हणून तुम्ही आपले डोळे निरोगी ठेवू इच्छित असाल तर पीच (Peach)खाणे आवश्यक आहे.

* बद्धकोष्ठता कमी करते : 
बद्धकोष्ठ कमी करण्यासाठी पीच (Peach) सर्वोत्तम फळांपैकी एक मानले जाते.  वास्तविक, त्यातील फायबर पचन त्वरेने करण्यास मदत करते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.  आपण यासाठी पीचचे रस घेऊ शकता.

* कोलेस्टेरॉल नियंत्रित करते : 
पीच (Peach) खाल्ल्यास उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत होते, ज्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.  त्याचे नियमित सेवन हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक टाळण्यासदेखील मदत करते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.