पिंपरी – कामावर चाललेल्या महिलेला भर रस्त्यात अडवून “मी आत्ता तुझ्यासाठी मणीमंगळसूत्र, हार फुले घेऊन आलो आहे. तू आत्ताच रस्त्यामध्ये माझ्याबरोबर लग्न कर’ असे म्हणत लग्नाची मागणी घातली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.
याबाबत दोन जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 18) सकाळी जगताप डेअरी चौक कॉर्नर, वाकड येथे घडली. सतीश कदम आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित महिलेने गुरुवारी (दि. 18) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित महिला पुण्यातील एका संस्थेत काम करतात. त्या गुरुवारी सकाळी मोपेड दुचाकीवरून कामावर चालल्या होत्या. त्यावेळी आरोपींनी महिलेचा दुचाकीवरून पाठलाग केला आणि जगताप डेअरी चौक कॉर्नर, वाकड येथे आरोपींनी महिलेला अडवले.
आरोपी सतीश महिलेला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर आरोपीने महिलेचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केले. महिलेने सतीश याला नकार दिला असता सतीशच्या साथीदाराने “तू त्याच्यासोबत लग्न कर’ असे महिलेला म्हटले.