पंजाब मधील लोकसभेचे उमेदवार निश्चीत करण्याची आपने सुरू केली प्रक्रिया
Updated On:

नवी दिल्ली – पंजाबमधील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी आप नेत्यांची बैठक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी शनिवारी झाली.
या बैठकीला केजरीवाल यांच्याशिवाय पक्षाचे राष्ट्रीय संयोजक, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.आम आदमी पक्ष इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे.
लोकसभेच्या जागा वाटपाबाबत दोन्ही पक्ष नेत्यांच्या काही बैठकाही झाल्या आहेत, त्या सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे दोन्ही पक्षांच्यावतीने सांगण्यात आले.
तथापि त्यांच्यातील जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नसतानाच आम आदमी पक्षाने आपले उमेदवार निश्चीत करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पंजाबमधील पक्षाच्या उमेदवारांच्या संभाव्य नावांवर चर्चा झाली.





