मुंबई – साऊथचा सुपरस्टार राणा डग्गुबती याने नुकतेच एका इन्व्हेन्टमध्ये अनेक खुलासे केले, त्याने सांगितले की तो आता फॅमिली मॅन झाला आहे.
इन्व्हेन्टमध्ये त्याला विचारण्यात आले की,’तू आता फॅमिली मॅन झाला आहेस’ यावर प्रतिक्रिया देताना राणा हसला आणि गप्प बसला. मिहिका बजाज बाळाची आई झाल्याचा अंदाज फॅन्स लावत आहेत. राणाही बाप झाला असून तो खूप आनंदी आहे. मात्र, यावर राणा यांच्याकडून कोणतेही योग्य उत्तर मिळू शकले नाही.
या सत्रात राणा यांनी सांगितले की,’ मी शालेय शिक्षणापर्यंतच शिक्षण घेतले आहे. नंतर कॉलेजला गेलो, पण एक वर्षानंतर कॉलेज सोडलं. मग इंडस्ट्रियल फोटोग्राफी शिकू लागलो. मी कॉलेजला गेलो नाही हे सांगायला मला लाज वाटत नाही.’ असे राणा म्हणाला.
पण हो, मी हैदराबादमधील सर्वोत्तम शाळेत नक्कीच शिकलो आहे. जिथे मला स्वप्न बघायला, पूर्ण करायला शिकवलं होतं. एखादी गोष्ट करायची ठरवली की ती पूर्ण करून सोडून द्या. राणा म्हणाला की, मला सुरुवातीपासून निर्माता व्हायचे होते. मी एक चित्रपट बनवला होता, जो प्रत्येकाने विकत घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर मी अभिनेता झालो. आज मला या व्यवसायात 15-20 वर्षे झाली आहेत आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या प्रत्येक चित्रपटात मी वेगळी भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे.’
एकूणच माझा चित्रपटसृष्टीतील प्रवास यशस्वी झाला आहे. मी कदाचित दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीतील एकमेव स्टार आहे ज्याने आतापर्यंत OTT मध्ये पदार्पण केले आहे. मात्र यावेळी त्याने फॅमिली मॅन झाला आहेस का यावर स्पष्टपणे काहीच सांगितले नाही.