कोण खोटारडे ते तुम्हीच ठरवा

भाजपच्या दाव्यावर राहुल गांधींची पत्रकारांना सुचना
नवी दिल्ली :  देशात सध्या सुरू असलेल्या एनपीआर, एनआरसी च्या वादाच्या संबंधात भाजपने राहुल गांधी यांना उद्देशून या वर्षातील सर्वात खोटारडी व्यक्ती असा उल्लेख केला आहे.

त्यावर पत्रकारांनी आज राहुल गांधी यांना त्यांची प्रत्रिकीया विचारली असता ते म्हणाले की तुम्ही पत्रकारांनी मी केलेले ट्विट पाहिले आहे. मोदींनी रामलिला मैदानावर केलेले भाषणही तुम्ही ऐकले आहे.

त्यात मोदींनी म्हटले आहे की देशात कोठेही डिटेंशन सेंटर्स कार्यरत नाहीत. देशात सुरू असलेल्या डिटेंशन सेंटरचा व्हिडीओही मी ट्विटरवर टाकला आहे तोहीं तुम्ही पाहिला असेल आता नेमके खोटे कोण हे तुम्हीच ठरवा अशी सुचना राहुल गांधी यांनी पत्रकारांना केली.

कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमीत्त कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी राहुल गांधी उपस्थित होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की सध्या एनपीआर आणि एआरसीचा जो तमाशा सुरू आहे तो नोटबंदीचाच दुसरा भाग आहे.

ही नोटबंदी 2 ही पहिल्या पेक्षाही अधिक घातक आहे. त्याचा गरिबांना मोठा त्रास होणार आहे. नोटबंदीच्या हे दुप्पट नुकसानकारक आहे असे ते म्हणाले. मोदींच्या त्या लाडक्‍या पंधरा मित्रांना या उपायांचा त्रास होणार नाही कारण त्यांना सरकारला कोणतीही कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत. यातून जो पैसा निर्माण होणार आहे तोही याच मोदी मित्रांच्या खिशात जाणार आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.