जामखेड : राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात सर्वात लक्षवेधी ठरत असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. इथे असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांना चांगलीच आघाडी मिळाली आहे. तर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यातच त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार राम शिंदे हे मोठ्या प्रमाणात पिछाडीवर असल्याने त्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला आहे.
दरम्यान, राम शिंदे यांना पराभव दिसताच त्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांनी टाळण्यासाठी मतमोजणी केंद्राच्या मागील दरवाजातून बाहेर पडले. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर तीव्र नाराजी दिसुन येत होती.