मुंबई – भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना औरंगजेबाची उपमा देत विखारी टीका केली. त्यानंतर नितेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नेत्यांमध्ये शाब्दिक वाद सुरु असताना आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंना सरडा म्हणत एक ट्विट केले आहे.
अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंचे काही फोटो देखील यावेळी ट्विट केले आहेत. ज्यामध्ये राणे मस्जिदीमध्ये आणि काही मुस्लिम मुलांसमोर बसल्याचे पाहायला मिळत आहे. यासह मिटकरींनी या ट्विटमध्ये जोरदार टीका केली आहे.
अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,”…आणि हा पवार साहेबांबद्दल बोलतोय. तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला? तुझा कदाचित हा तिसरा जन्म असावा पहिला नेपाळ दुसरा चिन आणि नंतर कोकणात. तु तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर आहेस ! तुला BJP ने तुकडा टाकलाय तो यासाठीच.#सरडा”
…आणि हा पवार साहेबांबद्दल बोलतोय. तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला? तुझा कदाचित हा तिसरा जन्म असावा पहिला नेपाळ दुसरा चिन आणि नंतर कोकणात. तु तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर आहेस!
तुला BJP ने तुकडा टाकलाय तो यासाठीच.#सरडा pic.twitter.com/JwXDdRIH4M— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 8, 2023
राणे कुटुंबीय आणि राष्ट्रवादीला वाद आता चांगलाच टोकाला पोहचला आहे. शरद पवार यांच्यावर झालेल्या विखारी टीकेनंतर आता राष्ट्रवादीचे इतर बडे नेते काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.