ईशान खट्टर हा नवोदित अभिनेता अलीकडेच नेहा धूपियाच्या “नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये आला होता. नेहाने ईशानला त्याचा भाऊ शाहीद कपर आणि शाहीदची पत्नी मीरा राजपूत यांच्याशी संबंधित काही प्रश्न विचारले.
नेहा म्हणाली की, ईशान तुझ्यावर तू भावाच्या घरात नीटपणाने राहात नसल्याचा आरोप आहे. यावर उत्तर देताना ईशान म्हणाला की, मीराला खोलीच्या मधोमध चपला ठेवलेल्या बिलकूल आवडत नाहीत.
चपला नेहमी कोपऱ्यातच ठेवल्या गेल्या पाहिजेत असे तिचे म्हणणे असते आणि तो कोपरा कोणता हे तीच ठरवते ! माझ्या पुतण्या आणि पुतणीसाठी मी मीराच्या नियमांचे पालन करण्याचे ठरवले आणि त्यानुसार मी आता वागू लागलो आहे.
घरात एका कोपऱ्यात चपला काढतो आणि अत्यंत शांतपणाने प्रवेश करतो. अर्थातच मला याबाबत कसलीच तक्रार नाहीये , असेही तो सांगतो. ईशानचे शाहीद आणि मीराशी खूप छान बॉंडिंग आहे. आपण सांगितलेलं सगळं ऐकतोय म्हटल्यावर वहिनीसाहेबही खुश असणे स्वाभाविकच म्हणायचं !