हेडिंग्ले – भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटीत मैदानात घुसखोरी केलेल्या डॅनियल जार्विस म्हणजेच जार्वो 69 याच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाणार आहे.
केवळ हेडिंग्लेवरील सामन्यातच नव्हे तर लॉर्ड्स कसोटीतही त्याने अशीच मैदानात घुसखोरी केली होती. आता त्याला या दोन्ही मैदानांवर पुन्हा कधीही प्रवेश दिला जाणार नसल्याचे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने जाहीर केले आहे.
लॉर्ड्स आणि हेडिंग्ले कसोटी सामन्यांदरम्यान भारतीय संघाची जर्सी परिधान करून जार्वोने मैदानात घुसखोरी केली होती. हेडिंग्ले कसोटीत मात्र, सुरक्षारक्षकांनी त्याला दंडाला धरून बाहेर काढले होते.
यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब या प्रकरणाला सुरक्षा भंग म्हणून जार्वोला दोषी धरले असून त्याला यापुढे मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही. तसेच त्याला आर्थिक दंडही केला जाणार आहे.