हैदराबाद – ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांचे वातावरण आज योगी आदित्यनाथ यांच्या रोड-शोमुळे आणखी तापले आहे. रोड-शो दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना योगी यांनी, “काही लोक मला विचारत होते हैदराबादचे नामकरण भाग्यनगर होऊ शकते का? मी त्यांना सांगितलं भाजप सत्तेत आल्यानंतर जर फरिझाबाद अयोध्या आणि अलाहाबाद प्रयागराज होऊ शकते तर हैदराबाद भाग्यनगर का होऊ शकत नाही?” असं म्हणत भाजपने येथे आपली सगळी ताकद पणाला लावल्याचेच दर्शवले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमवर जोरदार निशाणा देखील साधला. ते म्हणाले, “बिहारमध्ये, एमआयएमच्या एका नवनिर्वाचित आमदाराने शपथविधीवेळी ‘हिंदुस्थान’ या शब्दाचा उच्चार करण्यास नकार दिला. ते हिंदुस्थानात राहतात मात्र जेव्हा हिंदुस्थानच्या नावाने शपथ घेण्याची वेळ येते तेव्हा त्यांची वाचा बंद होते. यावरून एमआयएमचा खरा चेहरा पुढे येतोय.”
In Bihar, a newly-elected MLA of AIMIM declined to utter word ‘Hindustan’ during oath-taking. They will live in Hindustan but when it comes to taking oath in the name of Hindustan, they hesitate. This shows the true face of AIMIM: UP CM Yogi Adityanath in Hyderabad pic.twitter.com/ZkzPl2cVtm
— ANI (@ANI) November 28, 2020
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आता हैदराबाद आणि तेलंगणातील नागरिकांना जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणे शक्य होणार आहे.” असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.
In Bihar, a newly-elected MLA of AIMIM declined to utter word ‘Hindustan’ during oath-taking. They will live in Hindustan but when it comes to taking oath in the name of Hindustan, they hesitate. This shows the true face of AIMIM: UP CM Yogi Adityanath in Hyderabad pic.twitter.com/ZkzPl2cVtm
— ANI (@ANI) November 28, 2020
दरम्यान, या निवडणुकीसाठी केंद्रीय पातळीवरील नेत्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भूपेंद्र यादव हे या पालिका निवडणुकीचे पक्षाचे प्रभारी असून जीके रेड्डी यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते आधीच हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. यादव यांच्याकडेच बिहार विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती.
4 डिसेंबर रोजी मतमोजणी
हैदराबादमधील या निवडणुकीत सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस), एआयएमआयएम आणि भाजप यांच्यात त्रिकोणी टक्कर आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने दुब्बक विधानसभेच्या जागेवर विजय मिळवला होता. हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 4 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.
हैदराबादच्या जनतेसाठी पक्षाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात गरीब कुटुंबातील मुलांसाठी विनामूल्य टॅब्लेट आणि व्हर्च्युअल एज्युकेशन सिस्टमशी जोडण्यासाठी मोफत वायफाय सुविधा समाविष्ट आहे.
जाहीरनाम्यातील इतर आश्वासनांमध्ये झोपडपट्टीधारकांसाठी मालमत्ता कर 100% माफी आणि सर्व घरांना पिण्यासाठी मोफत पाणीपुरवठा यांचा समावेश आहे. थेट बाधित हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) पूरग्रस्तांना 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचेही आश्वासन भाजपने दिले आहे.