योगी आदित्यनाथांकडून पत्रकाराला शिवीगाळ! व्हिडीओ होतोय व्हायरल; पहा का चिडले मुख्यमंत्री?

नवी दिल्ली : आपल्या रागीट स्वभावामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेहमीच चर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांचा राग आणि त्यातून समोर आलेली त्यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनत आहे. आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत असतानाच असून, चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्ती शिवी दिल्याचा आरोप केला जात आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरल्याने योगींवर टीकाही होत आहे. तर दुसरीकडे योगींना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.

देशात करोना लसीकरण वेगाने सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर ते एका वृत्त संस्थेशी बोलत होते. प्रतिक्रिया देत असतानाच कॅमेरा हलल्याने योगी आदित्यनाथ चिडले आणि त्यांनी व्हिडीओ पत्रकाराला शिवी दिली.

सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱी सूर्य प्रताप सिंह यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत टीका केली आहे. ‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा आहे खरा चेहरा. थोडा आवाज झाला म्हणून कॅमेरामॅनला शिवी देत आहे. असो यांच्या सोबत असंच व्हायला हवं. देशातील सर्वात मोठी वृत्तसंस्था जेव्हा सरकारी प्रवक्त्यांपेक्षाही जास्त पुढे पुढे केल्या असं होणं साहजिक आहे. संताची भाषा ऐका,” असे सूर्य प्रताप यांनी म्हटले आहे.

मुंबई युवक काँग्रेसनंही हा व्हिडीओ शेअर केला आहे. “हा आहे अजय बिश्त यांचा खरा चेहरा. एएनआयच्या पत्रकाराला कॅमेऱ्यासमोरच दिली शिवी. साधूच्या वेशात दिसणाऱ्या या तथाकथित योगींच्या डोक्यात भरलेली अमर्यादा, असंस्कृतता आणि खालच्या पातळीवरील शब्दाबद्दल भाजपाला भलेही अभिमान वाटेल, पण देश अपमानित झाला आहे,” अशी टीका युवक काँग्रेसने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.