Yogi Adityanath in Maharashtra Election । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची भाजपची तयारी जोरात सुरू आहे. आता मतदानासाठी अवघे १५ दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रात येत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिली जाहीर सभा बुधवारी वाशिम विधानसभेत आहे, ज्यामध्ये ते भाजपचे उमेदवार श्याम खोडे यांचा प्रचार करणार आहेत.
योगींची ‘हिंदूवादी’म्हणून वर्णन Yogi Adityanath in Maharashtra Election ।
योगी आदित्यनाथ यांच्या स्वागतासाठी मुंबईत पोस्टर लावण्यात आले असून त्यात त्यांचे वर्णन ‘हिंदुवादी’ असे करण्यात आले आहे. त्याचवेळी योगी आदित्यनाथ यांच्या स्वागत सभेत जेसीबी बुलडोझर तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
योगी आदित्यनाथ यांचा ‘बंटेंगे तो कटेंगे” चर्चेत Yogi Adityanath in Maharashtra Election ।
उल्लेखनीय आहे की, हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान योगी यांची ‘बंटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा चांगलीच गाजली होती. त्यांच्या या घोषणेने हरियाणा निवडणुकीचे चित्र बदलल्याचे मानले जात आहे. आरएसएसनेही या विधानाचे समर्थन केले आहे. त्याचवेळी सीएम योगींच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गुजरातमध्ये ‘आपण एकत्र आहोत तर सुरक्षित आहोत’ असं वक्तव्य केलं होतं. अशा परिस्थितीत योगी आदित्यनाथ वाशीमच्या जाहीर सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा
उद्धव ठाकरेंची बंडखोरांवर कारवाई ; ‘या’ 5 बड्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई