लखनौ – आमचा पक्ष योगी आदित्यनाथ यांना पुन्हा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असा निर्धार एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला आहे.
त्यावर प्रतिक्रिया देताना योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, ओवैसी हे देशातील एक बडे नेते आहेत. ते भाजपला जर असे आव्हान देत असतील तर आमचे कार्यकर्ते ते आव्हान स्वीकारण्यास सिद्ध आहेत.
भारतीय जनता पक्ष पुन्हा उत्तरप्रदेशात सत्तेवर येईल याविषयी आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राज्यात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत दिसून येईल असे योगींनी म्हटले आहे.