नवी दिल्ली :- जापानच्या आयची-नागोया येथे 2026 मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत योगासनांचा प्रात्यक्षिक कार्यक्रम म्हणून समावेश करण्यात आला आहे. रविवारी झालेल्या आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी भारताचे रणधीर सिंग यांच्याकडे आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर ही घोषणा करण्यात आली.
या संदर्भात बोलताना नूतन अध्यक्ष रणधीर सिंग म्हणाले की, आगामी आशियाई खेळांचे वेळापत्रक आधीच तयार करण्यात आले असून त्याला मंजुरी देखील मिळाली आहे. योगासनांचा प्रचार करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहनत घेत आहेत. इतर खेळामध्ये दुखापतींची शक्यता असते, मात्र, योगासने शरीराला चैतन्य देण्याचे काम करतात.
Olympic Council of Asia : रणधीर सिंग ओसीएच्या अध्यक्षपदी, हे पद भूषवणारे ठरले पहिले भारतीय…
दरम्यान, अनुभवी खेळ प्रशासक असणारे रणधीर सिंग हे आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी विराजमान होणारे ते पहिले अध्यक्ष आहेत. आशियाई संघटनेच्या 44 व्या सर्वसाधारण सभेत त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली.