स्वामी राजश्री मुनी आणि एण्टोनिएटा रोझी यांना योग संवर्धन पुरस्कार

नवी दिल्ली- योग संवर्धन आणि विकासात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल गुजरातच्या राजश्री मुनी जीवनशैली, मुंगेर येथील बिहार स्कूल ऑफ योगा तसेच इटलीच्या एण्टोनिएटा रोझी आणि जपान योग निकेतन जपान यांना वर्ष 2019 साठीचा पंतप्रधान 2019 हा पुरस्कार देण्यात आला आहे.

वर्ष 2016 मध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन 21 जूनला करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधानांनी योग विकास आणि संवर्धनामध्ये कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. आयुष मंत्रालयाने या पुरस्कारांसाठीची निवड केली आहे.

उपलब्ध माहिती आणि कामगिरीद्वारे परीक्षकांनी चालू वर्षाचा पंतप्रधान योग पुरस्कार गुजरातच्या जीवनशैली अभियानाचे स्वामी राजश्री मुनी यांना वैयक्तीक वर्गवारीत राष्ट्रीय पुरस्कार, इटालीच्या ण्टोनिटा रोझी यांना आंतरराष्ट्रीय वर्गवारीत तसेच संघटनेच्या वर्गवारीमध्ये बिहार स्कूल ऑफ योगा आणि आंतरराष्ट्रीय संघटन वर्गवारीत जपान योग निकेतन जपानच्या नावाची शिफारस पुरस्कारासाठी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.