सहा हजार विद्यार्थ्यांची योग साधना

कराड – भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली योगसाधनेची देणगी चिरंतन असून प्रत्येक व्यक्तीने दररोज योगसाधना केल्यास उत्तम आरोग्या बरोबरच निरोगी शरीराची शिदोरी मिळेल, असा विश्वास तहसीलदार अमरदिप वाकडे यांनी व्यक्त केला.

टिळक हायस्कूलच्या मैदानावर तालुका प्रशासन, पंचायत समिती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद क्रीडा विभाग व टिळक हायस्कूल कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, प्राचार्य जी. जी. अहिरे, उपप्राचार्य ए. एस. आटकर, उपमुख्याध्यापक के. पी. वाघमारे, मुख्याध्यापिका सौ. बायस, सौ. कांबळे, पर्यवेक्षक पी. ए. तारू, पर्यवेक्षक शरद शिंदे तसेच राष्ट्रीय योग प्रशिक्षक महालिंग मुंढेकर, अल्पना जाधव, अनिता पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी टिळक हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, लाहोटी कन्या प्रशाला, नूतन मराठी शाळेच्या सुमारे सहा हजार विद्यार्थ्यानी सामूहिक योग साधना केली. राष्ट्रीय योग प्रशिक्षक महलिंग मुढेंकर, अल्पना जाधव, अनिता पाटणकर यांनी योगा व प्राणायाम, प्रात्यक्षिके घेतली. टिळक हायस्कूलने तयार केलेल्या योगातून उत्तम आरोग्याकडे या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे व गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य जी. जी. अहिरे यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षक भरत कदम व महिंद्र भोसले यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापक के. पी. वाघमारे यांनी आभार मानले.

योगा हे शास्त्र आहे. धावपळीच्या जीवनामध्ये शरीर, मन व आत्मा एकत्रितरित्या संतुलित घडविण्याचे व मन प्रसन्न ठेवण्यासाठी योगाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त आचरेवाडी, ता. पाटण येथील न्यू इंग्लिश स्कूल व कला व वाणिज्य ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात योगदिन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी सकाळी सात वाजता सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी योग करून आंतरराष्ट्रीय योग दिवस शाळेमध्ये साजरा केला. यावेळी योग प्रार्थना, पूरक हालचाली, योग प्रकार ताडासन, शिर्शासन, सूर्यनमस्कार, पद्मासन इत्यादी योग प्रकार करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. क्रीडा शिक्षक जे. एम. लोहार यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले.

मलकापूर येथील श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनिअर कॉलेज व आनंदराव चव्हाण विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कॉलेजच्या मैदानावर समर्पण फाउंडेशनचे पदाधिकारी सौ. रेश्‍मा जाधव, सौ. नेहा रसाळ, गणेश माळी, अक्षय शेवाळे, वैभव वीर यांचे उपस्थितीत 1105 विद्यार्थी व शिक्षकांनी योगा केला. सौ. एच. एम. मुल्ला यांनी योग दिनाचे संचलन व योग वर्गाची प्रात्यक्षिके घेतली. सूत्रसंचालन एस. के. तांबेकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार एस. वाय. गाडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.