तणाव कमी करण्यासाठी योगा गरजेचा

नगर- सुदृढ सशक्त आरोग्यासाठी नियमित योगा करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली. 21 जून 2015 ला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करू लागले. प्राचिन काळापासून भारतात साधू-संत योग साधना, योगाभ्यास करत आहेत. योगाला प्रतिष्ठा मिळाल्यानेच जगाने योगाला जागतिक मान्यता दिली आहे. 1985 पासून नगरमध्ये योग विद्या धाम योगाचा प्रचार व प्रसाराचे काम उत्तमरितीने करत आहे. हिंद सेवा मंडळाने जागतिक योग दिन साजरा केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांना कोणत्याही खेळात जायचे असेल तर शरीर सुदृढ असणे आवश्‍यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी रोज एक तास योग अभ्यास करावा. योगामुळे विद्यार्थ्यांचा ताण-तणाव कमी होऊन स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते. याचा शिक्षणात विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल. दैनंदिन जीवनात समाधान मिळावे, व्यवसाय व नोकरीतील ताण-तणाव कमी करण्यासाठी योगा गरजेचा आह, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.

जागतिक योग दिनानिमित्त क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो अहमदनगर सूचना एवं प्रसारण मंत्रालय भारत सरकार, हिंद सेवा मंडळ, व योग विद्या धाम यांच्या संयुक्त विद्यमाने दादा चौधरी विद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी माजी खा.दिलीप गांधी बोलत होते. यावेळी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष व दादा चौधरी विद्यालयाचे अध्यक्ष अजित बोरा, उप कार्याध्यक्ष डॉ.पारस कोठारी, माजी मानद सचिव सुनील रामदासी, मेहेर इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष जगदीश झालानी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माहिती व प्रसारण मंत्रालय माधवराव जायभाय, उपाधिक्षक फनीकुमार, किशोर बोरा, योग विद्या धामचे योग शिक्षक विनायक पवळे, सविता तागडे, ऋता ठाकूर, मंगल गौरीधर, सुनिता साळूंके, ऍड.विवेक नाईक, फादर अनिल कजबे, प्रा. सुनिल पंडित, शिवाजी दहिंडे, कालिंदी केसकर, लिलावती अगरवाल, जंगम, मुख्याध्यापक सर्वश्री संजय मुदगल, सुभाष येवले, वर्षा कुलकर्णी, रोहिणी फळे, प्राचार्य सुनिल सुसरे, हरियालीचे सुरेश खामकर आदि उपस्थित होते.

या योगदिन कार्यक्रमात दादा चौधरी विद्यालय, दादा चौधरी मराठी शाळा, मेहेर इंग्लिश स्कूल, श्रीमती पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालय या शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.