मुंबई – कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी सध्या जगभरात लस शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. अनेक देशांनी कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावाही केला होता. यातच काही चार महिन्यांपूर्वी योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावरील ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केले होते.
चार महिन्यांच्या कालावधीमध्ये ८५ लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत. कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने कोरोनिल विकून अंदाजे २४१ कोटी कमवले आहेत.
याबाबत (द प्रिंट ) या इंग्रेजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की,’२३ जून ते १८ ऑक्टोबरदरम्यान एकूण २३ लाख ५४ हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे. रामदेव बाबा आणि ‘पतांजली’चे आचार्य बालकृष्ण यांनी २३ जूनला या औषधाची घोषणा केली. हे औषध करोनावर खरोखरच प्रभावी आहे की नाही यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
करोनावर प्रभावी ठरणारे या औषधावरून अनेक वाद निर्माण झाले होते. त्यामुळे 23 जून रोजी पतंजलीचे योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी रामदेव बाबा यांनी, संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेले पहिले आयुर्वेदिक औषध असल्याचा दावा केला होता. मात्र त्यांच्या या दाव्यावरून देशात अनेक वाद निर्माण झाले होते. तसेच राजस्थान आणि महाराष्ट्रात या औषधावर बंदी देखील घालण्यात आली होती. या सर्व घडामोडी नंतर आता पतंजलीने आपल्याच दाव्यावरून माघार घेतली आहे.