योग दिन बुधमध्ये उत्साहात

बुध – आंतरराष्ट्रीय योग दिन श्री नागनाथ विद्यामंदिर, बुधमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाच्या भव्य मैदानावर विद्यार्थ्यांना एकत्र करून योग प्रार्थना, पुरक व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायम, खडी आसने व बैठी आसने विद्यालयाचे ज्येष्ठ योग तज्ज्ञ शिक्षक येवले सर, एम. डी. पाटील, डी. आर. कांबळे यांनी करून दाखवली व विद्यार्थ्यांनी ही मोठ्या उत्साहाने आसने केली.

विद्यालयाच्या प्राचार्य एस. आर. करांडे यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी योगासनांचे खूप महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडे व व्यायामाकडे लक्ष द्यावे असे सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक डी. वाय. मुल्ला, क्रीडा शिक्षक प्रा. काळुखे, कांबळे सर, एम. डी. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.