श्रीगोंदा तालुक्‍यात योग दिन उत्साहात

बाल गोपाळांसह तरुण व ज्येष्ठांनी केली प्रात्यक्षिके

श्रीगोंदा -श्रीगोंदा शहरासह तालुक्‍यात योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भल्या पहाटे ठिकठिकाणी योगाचे प्रात्यक्षिक करत बालगोपाळासह तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी निरोगी आयुष्य जगण्याचा संदेश दिला. बहुतांश शाळेत योगा दिनानिमित्त सामूहिक योग प्रात्यक्षिक झाले.

यामध्ये येथील श्रीमंत महादजी शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्ष्यवेधी ठरली. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मुलींची व मुलांची शाळा, सनराईज पब्लिक स्कूल, श्रीमंत राजमाता कन्या विद्यालय, महाराजा जीवजीराव शिंदे महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, मुरलीधर होणाराव विद्यालय, ज्ञानदीप विद्यालय, स्वामी समर्थ संस्थेचे श्रीगोंदा विद्यालय या शहरातील शाळांमध्ये योगा दिनाचा उत्साह पाहण्यास मिळाला.

शिक्षक, योग गुरू व परिसरातील नागरिकांनी मुलांसवेत योगा केला. तर काष्टी येथील जनता विद्यालयात माजी मंत्री बबनराव पाचपुते व डॉ. प्रतिभा पाचपुते यांनी योग प्रात्यक्षिके केली. ‘आरोग्यम धनसंपदा’ या हा मूलमंत्र योग गुरूंनी सर्वांना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.