जनता विद्यालयात योगदिन साजरा

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील वडगावपान येथील डी. के. मोरे जनता विद्यालयामध्ये शुक्रवारी जागतिक योग दिनानिमित्त विद्यालयातील 1 हजार 450 विद्यार्थ्यांची बैठकव्यवस्था योगाची प्रात्यक्षिके रेनवॉटर हार्वेस्टिंग (जलपुनर्भरन) या रचनेच्या आकारात करण्यात आली होती.

शरीरासाठी जसा योगा महत्वाचा आहे, तसा या जमिनीच्या आरोग्यासाठी पावसाचे पडणारे पाणी जमिनीत जिरवणे म्हणजेच पाण्याचे पुनर्रभरन करने काळाची गरज आहे. हाच सामाजिक संदेश या योगदिनाच्या निमित्ताने सर्वांना देण्यात आला. विद्यालयाचे क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर यांच्या संकल्पनेतून ही रचना करण्यात आली होती.

या वेळी विद्यालयातील प्राचार्य भाऊसाहेब शिंदे, उपमुख्याध्यापक लता पवार, पर्यवेक्षक भारत मुळे, प्रा. मच्छिंद्र दिघे व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचलन पोपट दये यांनी केले. मोरे विद्यालय हे शासनाच्या समाजोपयोगी कामात नेहमीच सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थ्यांमार्फत समाजास प्रबोधन करत आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.