नवी दिल्ली – योग दिनानिमित्त उद्योग जगतात बऱ्याच घडामोडी सोमवारी घडल्या. उद्योजकांनी योग करतानाचे छायाचित्र आपल्या ट्विटरवर अपलोड केले. बायोकॉन कंपनीच्या अध्यक्ष किरण मुजुमदार शॉ यांनी योग करतानाचे चित्र अपलोड करून योग म्हणजे शरीर, आत्मा, मन याचे संतुलन करण्याची प्रक्रिया आहे, असे सागितले.
नॅरडेकोचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी म्हणाले की, शरीर, मन संतुलित राखण्यासाठी योगाचा वापर करण्याची गरज आहे. हीरो इलेक्ट्रिक या कंपनीने म्हटले आहे की करोनाच्या काळात कर्मचारी, कामगार आणि डीलरमध्ये योग लोकप्रिय करण्यासाठी अनेक शिबिरे घेतली.
गोदरेज उद्योग समूहाताही कर्मचाऱ्यासाठी प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आगामी काळातही असे कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
On this #InternationalDayOfYoga let's pledge to integrate #yoga in our lives to keep us healthy and balanced both physically & mentally. #YogaDay#YogaDay2021 #YogaForWellness #YogaForAll pic.twitter.com/zqi2HYrUyZ
— Kiran Mazumdar-Shaw (@kiranshaw) June 21, 2021
ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलने एका व्हर्च्युअल कार्यक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी एका ऑनलाइन मंचावर एकत्र येत विविध योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली.
प्राणायम, सूर्यनमस्कार, ताडासन, अर्ध चक्रासन, शशांकासन, भुजंगासन, पवनमुक्तासन इत्यादी विविध योगमुद्रांची प्रात्यक्षिकेही दाखवली.स्कूलच्या ऑपरेशन्स विभागाचे संचालक राजीव बन्सल म्हणाले की, विद्यार्थ्यांना सर्वांगिण स्वास्थ्याच्या मार्गावरून चालण्याची प्रेरणा मिळेल.