मुंबई – हिंदुत्वाच्या मुद्दयावरून भाजप पक्ष ठाकरे सरकारवर नेहमीच टीका करत असतो. ठाकरे सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सहा महिन्यांहून अधिक काळ राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवली. भाजपाने शिवसेनेला आता पुन्हा याच मुद्यावरून टीका केली आहे. भाजप नेते नितेश राणे ट्विट करत शिवसेना पक्षावर हिंदुत्वाच्या मुद्दयावरून टीका केली आहे.
आहो पक्षप्रमुख..
खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता “सेक्युलर”आहे..
नाहीतर “हो मी नामर्द आहे” असं तरी ?— nitesh rane (@NiteshNRane) November 30, 2020
नितेश राणे म्हणाले,’हो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की, तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता “सेक्युलर”आहे. नाहीतर “हो मी नामर्द आहे” असं तरी सांगा, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं होत. या स्पर्धेत अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीसं दिली जातील, असं सकपाळ यांनी सांगितलं. त्यांचा या भूमिकेनंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. याच मुद्यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.