मुंबई – विनोदाचा उत्तम टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर मराठी कलाविश्वात आपले एक वेगळे स्थान निर्माण करणारे अभियानायचे सम्राट म्हणजेचं ‘अशोक सराफ’ यांचं फेसबुक आणि इंस्टाग्रामवर (२ जानेवारी २०२०) आगमन झालं आहे.
फेसबुकवर ashoksarafofficial या नावाने त्यांचं अकाऊंट असून, इन्स्टाग्रामवर #realashoksaraf या नावानं त्यांचं खातं आहे. आपल्या आगामी ‘प्रवास’ या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पदार्पण केलं आहे.
दरम्यान, अशोक सराफ यांनी इंस्टाग्रामवर आगमन करताना “माझा नवा डिजिटल प्रवास सुरु झालाय आणि हो… धनंजय माने इथेच राहतात” असं म्हंटल आहे.