मुंबई – येस बॅंक प्रकरणात अटक करण्यात आलेले दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. कंपनीचे प्रमुख धीरज वाधवान आणि कपिल वाधवान या वाधवान बंधूंनी मुंबई हायकोर्टात केलेला जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे.
सीबीआयने या प्रकरणाचा तपास सीआरपीसीच्या कलम 173 अन्वये केलेला नाही. तसेच अपुऱ्या माहिती व तपासाच्या आधारे त्यांनी विशेष सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे, असे म्हणणे त्यांच्या वतीने हायकोर्टात करण्यात आले होते.
अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ! मुंबई पोलीसांनी दाखल केला ‘हा’ नवा गुन्हा
तपास पूर्ण झाल्याशिवाय सादर झालेल्या याचिकेची न्यायालयाने दखल घेता कामा नये, अशी मागणी वाधवान यांचे वकील देसाई यांनी कोर्टात केली. त्यामुळे आपल्या अशिलाला जामीन मागण्याचा अधिकार आहे असे त्यांनी नमूद केले.
अर्णब गोस्वामींच्या अटकेवर पत्रकार संघटनांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका
या प्रकरणात वाधवान बंधूंच्या कोठडीतील चौकशीची गरज नाही, असेही त्यांनी नमूद केले होते. पण हायकोर्टाने त्यांचे म्हणणे अमान्य करीत त्यांचा जामीन फेटाळून लावला.