पाणी गळतीमुळे पालिकेचे “एनआयसीयू’ बंद

संग्रहित छायाचित्र

येरवड्याच्या रुग्णालयातील प्रकार : महापौरांनी घेतला आढावा

पुणे – अवघ्या दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने “सीएसआर’ अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी खर्चातून येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात उभारलेले नवजात अर्भक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) पाणी गळतीमुळे बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रुग्णालयातील गळतीबाबत महापालिकेच्या भवन विभागाने योग्य उपाययोजना न केल्याने ही स्थिती उद्‌भवली आहे. याची गंभीर दखल महापौर मुक्ता टिळक यांनी ही गळती थांबविण्याचे आदेश भवन विभागास दिले आहेत. दरम्यान, हे “एनआयसीयू’ पुन्हा सुरू होईपर्यंत येथील रुग्णांची व्यवस्था सोनावणे हॉस्पिटल तसेच कमला नेहरू रुग्णालयात केल्याचे महापौरांनी पत्रकारांना सांगितले.

महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी मुकूल माधव फाउंडेशनच्या सहकार्याने पालिकेच्या सोनावणे हॉस्पिटल आणि राजीव गांधी रुग्णालयात “एनआयसीयू’ सुरू केले आहेत. मात्र, या विभागात गेल्या काही दिवसांपासून पाणी गळती होत असून तेथे आर्द्रता म्हणजेच ओलसरपणा निर्माण होत आहे. येथील ड्रेनेजही नादुरूस्त झाले आहे. त्यामुळे हा विभाग बंद करण्यात आला आहे. येथे महापालिकेकडून आवश्‍यक सुविधाही देण्यात येत नाहीत. याचा आढावा घेण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी मुकुल माधव फाउंडेशन आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती. यात राजीव गांधी रुग्णालयातील गळती थांबवून तातडीने “एनआयसीयू’ सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे महापौर म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)