सना (येमेन) – येमेनमध्ये नव्याने स्थापन झालेले मंत्रिमंडळ अदेनमध्ये येताच अदेनच्या विमानतळावर मोठा बॉम्बस्फोट झाला. हा स्फोट कोणी केला, हे त्वरित समजू शकले नाही. या स्फोटामध्ये मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्याला इजा झाल्याचे वृत्त नाही. मात्र विमानतळावर काही जणांचे मृतदेह पडले असल्याचे अधिकाऱ्यंनी सांगितले.
या बॉम्बस्फोटानंतरच्या परिस्थितीचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये विमानतळाच्या इमारतीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते आहे. परिसरामध्ये दोन मृतदेह पडल्याचेही दिस्ते आहे. त्यापैकी एक मृतदेह पूर्णपणे जळून गेला तर दुसऱ्या एका मृत व्यक्तीला सावरण्याचा प्रयअत्न उपस्थितांपैकी एकजण करताना दिसतो आहे.
येमेनचे पंतप्रप्रधान माई अब्दुलमलिक सईद यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यातच मंत्रीपदाची शपथ घेतली. येमेनमधील विभाजनवाद्यांबरोबर झालेल्या सत्तासहभागाच्या तडजोडीनंतर अन्वीन मंत्रिमंडळ स्थापन् करण्यात आले. अदेनवरून हे नवीन मंत्रिमंडळ परतत्त असतानाच हा स्फोट झाला.
येमेनमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या यादवीच्या काळात सरकार सौदीची राजधानी रियाधमध्ये परागंदा झाले होते. सौदी अरेबियात हद्दपार झालेले येमेनने अध्यक्ष अबेद रब्बो मन्सूर हादी यांनी या महिन्याच्या सुरूवातीला मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची घोषणा केली होती.