हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील बल्ह खोऱ्यातील एका शेतकऱ्याने स्वित्झर्लंडमध्ये पिकणाऱ्या पिवळ्या आणि जांभळ्या फुलकोबीचे उत्पादन घेतले आहे. या अनोख्या फ्लॉवरमुळे रोगांशी लढण्याची क्षमता (प्रतिकारशक्ती) वाढते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे गर्भवती महिलांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स, पोषण, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि जस्त असतात, जे मानवी शरीरासाठी आवश्यक असतात.
पांढऱ्या रंगाच्या फुलकोबीला शेतकऱ्याला केवळ 30 ते 40 रुपये किलो दर मिळत आहे, तर पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फुलकोबीला 60 ते 80 रुपये किलो भाव मिळत आहे. त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.
बल्ह खोऱ्यातील प्रगतीशील शेतकरी दिनेश यांनी सांगितले की, त्यांनी सुमारे सहा एकर जमिनीवर स्विस फ्लॉवरची लागवड केली आहे. हे बियाणे परदेशी कंपनीकडून आणले होते.
त्यांनी यूट्यूबवर ही फुलकोबी कशी उगवायची ते पहिले. त्यानंतर त्यांनी स्वतः त्यावर काम केले आणि आज पांढरा, पिवळा आणि जांभळा कोबी असे तीन प्रकार उगवत आहेत.
शेतकऱ्यांना करणार प्रेरित
मंडी जिल्याचे कृषी विभाग उपसंचालक राजेश डोगरा यांनी सांगितले की, बल्ह येथील शेतकऱ्याने जांभळा आणि पिवळा कोबी पिकवला आहे. विभागाचे पथक त्यांच्याशी संपर्क साधून इतर शेतकऱ्यांनाही या कोबीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. त्यांनी सांगितले की ही कोबी रोगप्रतिकार शक्ती वाढवते. पौष्टिक असण्यासोबतच ते गर्भवती महिलांसाठीही उपयुक्त आहे.