कर्नाटकमध्ये पुन्हा येडियुरप्पांचे सरकार येणार : आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

बंगळुरू : कर्नाटकमध्ये कुमारस्वामी पडल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. दरम्यान, भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा राज्यपाल वजुभाई वाला यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहेत. या भेटीदरम्यान येडियुरप्पा यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, आज संध्याकाळी येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

राज्यपालांची भेट घेऊन येडियुरप्पा त्यांना 105 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र सोपवले, तसेत त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. दरम्यान, येडियुरप्पा हेच भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भाजपाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हे करतील. त्यानंतर आज संध्याकाळी येडियुरप्पा यांचा शपथविधी होणार आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये पर्यायी सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्यास भाजप नेते येदियुरप्पा यांना त्यासाठी कसरत करावी लागणार आहेत. भाजप आमदारांपैकी ज्येष्ठ आमदारांनाही मंत्रीपद हवे आहे. त्याशिवाय बंडखोर आमदारांपैकी काही जणांना महत्त्वाची पदे द्यावी लागतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.