कर्नाटकात आज येडियुरप्पा सिद्ध करणार बहुमत चाचणी

बंगळुरू : कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज बीएस येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी 17 बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केल्याने भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. दरम्यान, आता भाजपला आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी 104 आमदारांची गरज आहे तर भाजपच्या पाठिशी 105 आमदार असल्याने येडियुरप्पा सहज बहुमत सिद्ध करणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, बहुमत सिद्ध झाल्यानंतर पहिल्यांदा आपण वित्त विधेयक मंजूर करून घेणार असल्याचे येडियुरप्पा यांनी सांगितले. तसेच वित्त विधेयक मंजूर करत असताना पुर्वीच्या सरकारने जे विधेयक तयार केले आहे त्यात आपण कोणताही बदल करणार नसल्याचेही येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले. सरकारी कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार देण्यासाठी हे विधेयक मंजूर करून घेण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर दुसरीकडे सत्तेत आल्यानंतर येडियुरप्पा सरकार विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्‍वासाचा ठराव आणण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. जर विधानसभा अध्यक्षांनी स्वत: होवून राजीनामा दिला नाही तर भाजपकडून हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)