कर्नाटकात पुन्हा येडियुरप्पा सरकार? काँग्रेसने स्वीकारला पराभव

बंगळूर – कर्नाटक विधानसभेच्या १५ जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या असून याची आज मतमोजणी सुरु आहे. यामध्ये भाजपा १० जागांवर आघाडीवर आहे. तर पुन्हा सत्ता राखण्यासाठी येडियुरप्पा सरकारला केवळ सहाच जागा आवश्यक आहेत. यामुळे प्रथमदर्शनी भाजपचा विजय निश्चित मानला जाणार आहे. दरम्यान, काँग्रेसने आपला पराभव स्वीकार केला आहे.

काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी म्हंटले कि, या १५ मतदारसंघातील जनादेश आम्हाला मान्य आहे. लोकांनी पक्षबदलूंना स्विकारले आहे. त्यामुळे आम्ही पराभव स्विकारला आहे. या पराभवामुळे आम्ही निराश होणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कॉंग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे त्या पक्षांचे कर्नाटकमधील आघाडी सरकार कोसळले. त्या बंडखोरीचा राजकीय फायदा उठवत त्या राज्यात भाजपने सत्ता काबीज केली. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्याने रिक्त झालेल्या जागांपैकी १५ जागांसाठी पोटनिवडणूक झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.