पिंपरी – रुग्णालय परिसरात फोटो काढण्यास मनाई असल्याचे सांगण्यासाठी गेलेल्या महिला सुरक्षारक्षकाशी दोघांनी हुज्जत घातली. सोमवारी (दि. 22) सकाळी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात हा प्रकार घडला. त्यानुसार पिंपऱी येथील संत तुकाराम पौलीस चौकीत घटनेची माहिती दिली असून, दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोभा साबळे आणि गिरीश दिलीप साबळे (दोघे रा. गांधीनगर, पिंपरी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. वायसीएम रुग्णालयात फोटो काढण्यास मनाई आहे. साबळे हा रुग्णालयात मोबाईलवर फोटो काढत होता. त्यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्यांनी त्यास फोटो काढू नका, असे सांगितले. त्या कारणावरुन वरील दोघांनी हुज्जत घालून महिला कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली.