पिंपरी – यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय करोनासाठी समर्पित केले होते. ते आजपासून 50 टक्के क्षमतेने नॉन कोविड करण्यात येणार आहे. याठिकाणी इतर आजारांवरील रुग्णांवरही उपचार करण्यात येणार आहे. पुन्हा करोनाचा संसर्ग वाढू शकतो. यामुळे पूर्ण क्षमतेने नॉन कोविड करण्यात येणार नाही. मात्र 50 टक्के इतर रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
रुग्णालयाला दोन प्रवेशद्वार आहेत. तसेच चार मजले आहेत. एका प्रवेशद्वारातून करोनाच्या रुग्णांना तर दुसऱ्या बाजूने इतर रुग्णांना प्रवेश दिला जाईल.
दोन मजल्यांवर करोनच्या रुग्णांवर तर इतर ठिकाणी बाकीच्या रुग्णांवर उपचार केले जातील.