भाजप नगरसेवकाने गैरवर्तन केल्याचा आरोप
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात एका भाजप नगरसेवकाने रविवारी (दि. २६) रात्री उशिरा धिंगाणा घातला. डॉक्टर आणि संबंधित कर्मचारी यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण रात्री त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, संतापलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. २७) सकाळी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच कोणतेही निवेदन प्राप्त झाले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दै. ‘प्रभात’शी बोलताना सांगितले.