करोना रुग्णाची ‘तल्लफ’ भागवण्यासाठी नातेवाईकांची भलतीच शक्कल; टरबूजातून पाठवली दारू आणि तंबाखू

यवतमाळ – करोना रुग्णाची तल्लफ भागवण्यासाठी नातेवाईकांनी टरबूजातून दारू आणि तंबाखू पाठवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार यवतमाळमधील वसंतराव नाईक रुग्णालयात घडला आहे. मात्र, नातेवाईकांचा हा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने हानून पडला आहे.

सविस्तर माहिती अशी की, यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करोना उपचारासाठी रुग्ण दाखल आहेत. यापैकी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्या रुग्णांची तल्लफ भागवण्यासाठी त्यांना दारू आणि तंबाखू पुरवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी भलतीच शक्कल लढवली. टरबूज कापून त्यातून दारू आणि तंबाखू पाठवण्यात येत होती. मात्र, वेळीच ही बाब रुग्णालयातील सुरक्षारक्षक आणि डाॅक्टरांच्या लक्षात येताच रुग्णांच्या नातेवाईकांचा हा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने हानून पाडला.

दरम्यान, यवतमाळ मध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णाला फळांतून दारू आणि तंबाखूचा पुरवठा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णालय प्रशासन सतर्क झाले आहे. संशय असलेल्या व्यक्तिंचे साहित्य तपासले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.