यवतमाळ – राज्यात करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना विदर्भातून एक दिलासादायक बातमी येत आहे. यवतमाळ येथे 3 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळले होते. हे सर्व लोक दुबई सहलीहून परतले होते. त्यांना 12 मार्च रोजी ऍडमिट केले होते. आज त्या तिघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
संबंधित तिनही रूग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना आता 14 दिवस विलग ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आता जिल्ह्यात सध्या एकही करोनाबाधित नाही, अशी माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिली आहे.