यवतमाळ, नांदेडला भुकंपाचा धक्का

यवतमाळ – यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याला आज भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्‍टर स्केलवर याची नोंद 3.7 इतकी झाली. सकाळी 9 वाजून 10 मिनीटशंनी हा धक्का बसला. नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहुर, हदगाव, आणि हियामत नगर, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, कारंजखेड, पोहंडुल, होता, आणि वाळद या गावामध्ये हा धक्का जाणवल्याचे तेथील गावकऱ्यांनी सांगितले.

मात्र यामुळे कोठेही कसलीही हानी झाल्याचे वृत्त नाही. गुरूवारी सकाळी सातारा जिल्ह्यातील काही गावांमध्ये 4 रिश्‍टर स्केलचा धक्‍का बसला होता. तथापी तेथेही कोणतीही हानी झाली नाही. आज यवतमाळ आणि नांदेडला बसलेल्या धक्‍क्‍यामुळे स्थानिक नागरीकांमध्ये मात्र चांगलीच घबराट निर्माण झाली होती. या भूकंपाचा केंद्र बिंदू कोठे होता हे मात्र लगेच समजू शकलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.