यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचे उदघाटन

पेठ – यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत सातगाव पठार भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांच्या विविध स्पर्धा पेठ येथे पार पडल्या. अशी माहिती केंद्रप्रमुख विजय सुरकुले यांनी दिली.

विद्यार्थ्यांना शालेय जीवनात खेळाची आवड लागावी. मैदानावर खेळण्यात येणारे खेळ आणि त्यामुळे लाभणारी शारीरिक तंन्दुररुस्ती हा मुख्य उद्देश ठेऊन पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पेठ ता आंबेगाव येथे हा महोत्सव घेण्यात आला. आजच्या काळातील मुले खेळापासुन दुर जावुन मोबाईल वरील गेमवर रमबाण होताना दिसून येतात.

या स्पर्धा मुळे मुले परत मैदानावर वळावेत हा उद्देश आहे केंद्रस्तरीय नंतर बिट स्तर, तालुका स्तर जिल्हा स्तर असे चार स्तरावर ही स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून विविध खेळाडू निवडण्यास मदत होते.

स्पर्धा उद्घाटन प्रसंगी सरपंच सुरेखा पडवळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती मोरडे, केंद्रप्रमुख विजय सुरकुले, मुख्याध्यापक तुकाराम पोटे यांच्या हस्ते झाले. तर बक्षीस वितरण समारंभ पंचायत समिती सदस्य शीतल तोडकर, माजी उपसरपंच संतोष धुमाळ, अशोक राक्षे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

दरम्यान, यावेळी किरण कैलास कुदळे यांचे कडून सर्व विध्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. कार्यक्रम व्यवस्था आंबेगाव प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विजय घिसे व सचिन तोडकर, रविंद्र वानखेडे यांनी पहिली. कार्यक्रम सूत्रसंचालन नवनाथ भूमकर यांनी केले. आणि नारायण बनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
—————————————
छायाचित्र मजकूर
पेठ ता आंबेगाव येथे यशवंतराव चव्हाण कला,क्रिडा स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी बोलताना केंदप्रमुख विजय सुरकुले.

Leave A Reply

Your email address will not be published.