यशच्या चाहत्याची आत्महत्या; सुसाईडनोटमध्ये केलीय ‘ही’ मागणी

मुंबई – केजीएफ चित्रपटाने बॉक्‍सऑफिसवर जोरदार कमाई केली. यशला या चित्रपटामुळे केवळ प्रादेशिकच नाही तर जगभरात मोठी प्रसिद्धी मिळाली. आता सर्वांनाच या चित्रपटाच्या पुढच्या भागाची प्रतिक्षा आहे. त्याच दरम्यान, या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता यशचा चाहता असणाऱ्या एकाने आत्महत्या केली आहे.

आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून त्याने जीवनयात्रा संपवली. एका 25 वर्षीय तरुणाने सुसाईड नोट लिहून घरात गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रामकृष्ण असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण कर्नाटकातीस मांड्या जिल्ह्यातील रहिवासी होता. तो यश आणि कर्नाटकमधील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांचा खूप मोठा चाहता होता.

आत्महत्येपूर्वी त्याने या दोन्ही मोठ्या व्यक्तींसाठी एक संदेश लिहून आपली शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी अंतिम संस्कारासाठी यावं अशी शेवटची इच्छा या सुसाईडनोटमध्ये रामकृष्णने लिहिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.