यशस्विनीने साधला सुवर्णवेध

विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्ण
रिओ दी जेनिरो, दि. 2 – भारताच्या यशस्विनी सिंग देसवालने विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकासह ऑलिम्पिक कोटाही निश्‍चित केला. या वर्ल्डकपमधील भारताचे हे तिसरे सुवर्ण ठरले आहे.

यावेळी माजी ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या ओलेना कोस्टोविचचे कडवे आव्हान 22 वर्षीय यशस्विनीसमोर होते. मात्र, 22 वर्षीय माजी कनिष्ठ विश्वविजेत्या यशस्विनीने आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत 236.7 गुणांची कमाई केली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या ऑलिनाने 234.8 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर सर्बियाच्या जस्मिना मिलाव्होनोव्हिचने 215.7 गुणांसह कांस्यपदक मिळवले.

पात्रता फेरीत 582 गुणांसह यशस्विनी अव्वल स्थानावर होती. त्यामुळे अंतिम फेरीत दाखल होताना यशस्विनीचा आत्मविश्वास वाढला होता. पहिल्या दहा शॉटअखेर यशस्विनी 98.1 गुणांसह आघाडीवर होती. तर, 97.7 गुणांसह जस्मिना दुसऱ्या स्थानी होती. 34 वर्षीय ओलेना 95.6 गुणांसह सातव्या क्रमांकावर होती. त्यानंतर अनुभव पणाला लावत ओलेना चौदा शॉटअखेर तिसऱ्या क्रमांकावर आली. यशस्विनी 137.9 गुणांसह अव्वल, तर जस्मिना 137.1 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. असाच क्रम विसाव्या शॉटअखेर कायम होता. त्यानंतर ओलेनाने मोक्‍याच्या क्षणी ओलेनाने 10.9 गुणांची नोंद केली. त्या जोरावर ती दुसऱ्या क्रमांकावर पोचली. अखेरच्या शॉटअखेर यशस्विनीचे 227.1, तर ओलेनाचे 225.3 गुण होते. अखेरच्या शॉटवर ओलेनाने 9.5 गुण नोंदविले, तर यशस्विनीने 9.6 गुण नोंदवीत संस्मरणीय सुवर्णयश मिळविले. जस्मिनाला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. तसेच, तिने टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवेशही निश्‍चित केला.

तेजस्विनी सावंत 47व्या स्थानी
थ्री पोझिशन्स प्रकारात काजल सैनीला पात्रता फेरीत 1167 गुणांसह 22व्या स्थानावर समाधान मानावे लागले. प्रोनमधील माजी विश्वविजेत्या तेजस्विनी सावंतला 1156 गुणांसह 47वे स्थान मिळाले.
पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात आदर्श सिंग आणि अनिशल भानवाला यांनी पहिल्या प्रीसिजन फेरीत अनुक्रमे 13वे आणि 14वे स्थान मिळवले. या दोघांनी प्रत्येकी 291 गुण मिळवले. अनहार जावंडाने 281 गुणांसह 48वे स्थान मिळवले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)