मुंबई – यश चोप्रा यांना किंग ऑफ रोमान्स म्हटले जाते. हिंदी चित्रपटसृष्टीत रोमॅटींग चित्रपट आणि लव्ह स्टोरीज बनवण्यामध्ये यश चोप्रा यांचा हात धरण कोणत्याही दिग्दर्शकाला शक्य नाही. यश चोप्रा यांचा संपूर्ण प्रवास नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार्या ‘द रोमांटिक्स’ या डॉक्युमेंट्रीद्वारे सर्वांसमोर येणार आहे. बुधवारी या सिरींजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
यश चोप्रा आणि यशराज फिल्म्ससोबत काम केलेल्या सर्व बॉलीवूड कलाकारांशी झालेल्या संवादाची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. त्यात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, हृतिक रोशन, माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी, भूमी पेडणेकर, अभिषेक बच्चन, आयुष्मान खुराना आणि दिवंगत ऋषी कपूर यांचाही समावेश आहे.ज्येष्ठ लेखक सलीम यांचे संभाषणही या डॉक्युमेंट-सिरीजचा एक भाग असणार आहे.
यासोबतच यशराज यांच्या आयकॉनिक चित्रपटांची झलकही सादर करण्यात आली आहे. आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा हे देखील डॉक्युमेंट-सिरीजचा एक भाग असल्याचे ट्रेलरमधून पाहायला मिळते. चार भागांची ही डॉक्युमेंट्री सिरीज स्मृती मुंद्रा यांनी दिग्दर्शित केली आहे. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ही डॉक्युमेंट्री मालिका प्रदर्शित होत आहे.
पाच दशकांहून अधिक प्रवासात यश चोप्रांनी एकापेक्षा एक सुपरहिट रोमँटिक चित्रपट दिले. त्यापैकी दाग, कभी कभी, सिलसिला, चांदनी, लम्हे, ये दिलगी, दिल तो पागल है ही नावे घेता येतील. यश चोप्रा यांचे 2012 मध्ये निधन झाले. शाहरुख, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा स्टारर ‘जब तक है जान’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.