नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर एका प्रवासी बसचा आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २९ जण ठार झाले आहेत तर १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथक ठिकाणी पोहचले असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
#UPDATE 29 persons dead after a bus carrying around 40 passengers fell into ‘jharna nalla’ on Yamuna Expressway in Agra. Rescue operation underway. pic.twitter.com/mAnY9pUsgX
— ANI UP (@ANINewsUP) July 8, 2019
प्रवासी बस लखनऊ या ठिकाणाहून दिल्लीला जात होती. त्याचवेळी हा अपघात झाला आहे. या बसमध्ये ४७ प्रवासी प्रवास करत होते अशीही माहिती मिळते आहे. मृतांच्या नातेवाईकांना उत्तर प्रदेश रोडवेजने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत.