नीतू सिंहच्या लुकमध्ये यामी गौतम

अभिनेत्री यामी गौतमने तिच्या आगामी ‘बाला’ चित्रपटातील ‘एक मैं और एक तू’ गाण्यासाठी बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंगचा लूक पुन्हा केला आहे. आपल्याला 1970 च्या दशकातील अनेक गोष्टी आवडत असल्याचे यामी गौतमने सांगितले. तेंव्हाची फॅशन सदाबहार होती.

तेंव्हाच्या काळचे लुक, ड्रेस स्टाईल, शॉर्ट ड्रेस, केसांचे ऍक्‍ससरीज, पोल्का डॉट प्रिंट, इत्यादी सगळेच भारी होते, असे यामी म्हणाली. “बाला’साठी मुद्दामच या दशकातील “एक मै और एक तू’ हे गाणे रिक्रिएट करायचे ठरवले, कारण हे आपले अगदी आवडीचे गाणे असल्याचेही गामीने सांगितले.

त्यातील नीतू सिंहचा लुकही आपला आवडता असल्यानेच हा लुक आपण करायचे ठरवले. त्यासाठी नीतू सिंहची परवानगी मागितली असता, त्यांनी आनंदाने परवानगी दिल्याचे तिने सांगितले. या गाण्याला आपल्या पद्धतीने रिक्रिएट केले असले तरी त्याची प्रेरणा 1970 सालचे मूळ गाणेच होते, असेही यामी म्हणाली. यामीलाही स्वत: च्याच रूपात आणायचे होते. म्हणून तिने हट्टाने हा लुक स्वीकारला आहे.

यामीने या चित्रपटात टिकटॉक स्टारची भूमिका साकारली आहे. “बाला’मध्ये यामीबरोबर भूमी पेडणेकर आणि आयुष्मान खुरानाही आहे. आयुष्मानला तरुण वयातच टक्कल पडले आहे. त्याचीच त्याला चिंता लागून राहिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.