हृतिक रोशनबरोबरचा “काबिल’चीनमध्ये रिलीज करण्यासाठी यामी गौतम चीनला गेली होती. तिथे कुंग फू मास्टर जॅकी चॅनने यामीला एक अतिशय मौल्यवान वस्तू दिली आहे. त्याने चिनी बनावटीची एक शाल यामीला दिली आहे. ही शाल मिळाल्याने यामीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
]यामीने एका मेसेजद्वारे जॅकी चॅनचे आभार मानले आहेत. “स्वतः जॅकी चॅनने मला एक भेट दिली आहे, हे समजल्यावर मी तर बुचकळ्यातच पडले होते. त्यावेळी मी चॅन यांना भेटू शकले नव्हते. कारण मी भारतात”बाला’चे शुटिंग करत होते. पण अलिकडेच बिजींगला गेले होते, तेंव्हा जॅकी चॅन यांनी दिलेले पार्सल मिळाले.’असे यामीने म्हटले आहे.
यामीने लहानपणापासून जॅकी चॅन यांचे सिनेमे बघितले आहेत. जॅकी एक लिजेंड आहे. लवकरच त्यांची भेट होईल अशी यामीला आशा वाटते आहे. “काबिल’चीनमध्ये रिलीज झाला तेंव्हा हृतिकने जॅकी चॅनची भेट घेतली होती. त्याने या भेटीचे फोटो सोशल मिडीयावरही पोस्ट केले आहेत. हृतिक आता लवकर “सुपर 30’मध्ये गणिताच्या शिक्षकाच्या रोलमध्ये दिसणार आहे. यामीबरोबरचा “काबिल’ भारतातल्या प्रेक्षकांना जेवढा आवडला, त्यापेक्षा चीनमधील प्रेक्षकांना आवडेल अशी त्यालाही आशा वाटते आहे.